असा असणार मोदींचा उद्याचा अयोध्या दौरा


नवी दिल्ली – अयोध्या नगरी राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी सज्ज झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात न्हाऊन निघाले आहे. त्याचबरोबर मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला असून विद्युत दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण अयोध्या नगरी झळाळून उठली आहे. त्याचबरोबर अयोध्यानगरीत जागोजागी प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक लावण्यात आले आहेत. तसेच मोदींच्या दौऱ्यामुळे शहरात कडक बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 5 ऑगस्ट रोजी दुपारी राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.

मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थिती कोरोनाच्या सावटाखाली होत असलेला हा भूमिपूजन सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. नरेंद्र मोदी राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर देशाला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान अयोध्येतील पंतप्रधानांचा कार्यक्रम नेमका कसा असणार याची थोडक्यात माहिती देत आहोत.

असा असणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संपूर्ण कार्यक्रम

  • दिल्लीहून सकाळी 9.35 वाजता प्रस्थान
  • लखनऊ विमानतळावर 10.35 वाजता लॅडिंग
  • अयोध्येसाठी 10.40 वाजता हेलिकॉप्टरने रवाना होणार
  • अयोध्याच्या साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर 11.30 वाजता लॅंडिंग
  • हनुमानगढी येथे 11.40 वाजता पोहचणार त्यानंतर 10 मिनिटे दर्शन आणि पूजा
  • राज जन्मभूमी परिसरात 12 वाजता पोहचणार
  • रामलल्लांचे दर्शन आणि पूजा
  • रामलाला परिसरात 12.15 वाजता पारिजातचे वृक्षारोपण
  • भूमिपूजन कार्यक्रमाला 12.30 वाजता सुरुवात
  • राम मंदिर आधारशिलाची 12.40 वाजता स्थापना
  • साकेत कॉलेजच्या हेलिपॅडकडे 2.05 वाजता प्रस्थान
  • लखनऊमधून 2.20 वाजता हेलिकॉप्टरने प्रस्थान
  • त्यानंतर लखनऊवरून दिल्लीसाठी रवाना होणार