फोटो : पहा निर्मितीनंतर आतून बाहेरून असे दिसेल भव्यदिव्य राम मंदिर

अयोध्यानगरी 5 ऑगस्टला होणाऱ्या राममंदिराच्या ऐतिहासिक भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सज्ज झाली आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाआधी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रने ट्विटरवर या भव्यदिव्य राम मंदिराच्या मॉडेलचे फोटो शेअर केले आहेत. 1989 च्या प्रस्तावित मॉडेलमध्ये बदल करून मंदिर अधिक भव्य करण्यात आले आहे. आधी मंदिराच्या मुख्य कळसाची उंची 128 फूट होती, जी वाढवून 161 फूट करण्यात आली आहे. 5 घुमटांच्या खाली 4 भाग असतील आणि एक मुख्य कळस असेल.

राम मंदिराचा नकाशा तयार करणारे मुख्य आर्किटेक्ट सोमपुरा यांचा मुलगा निखिल सोमपुरा यांनी सांगितले की, एकूण 67 एकर जमीन आहे. मंदिर 2 एकरातच बनले. इतर जागेत परिसरचा विस्तार केला जाईल. मंदिराच्या निर्मितीमध्ये बंसी पहाडपूरचे दगड लागतील. येथील दगड आपल्या मजबूती आणि सुंदरतेसाठी ओळखले जातात. मंदिराच्या निर्मितासाठी जवळपास चार लाख घट फूट दगडाचा वापर होईल. माती परिक्षणाच्या आधारावर पायासाठी खोदकाम केले जाईल. मंदिराचा पाया 20 ते 25 फूट खोल असू शकतो.

Image Credited – Aajtak

मंदिराच्या निर्मितीसाठी 3 ते 4 वर्ष लागू शकतात. मंदिर तीन मजली असेल. मंदिरात एकूण 318 स्तंभ लावले जातील. याची उंची 14 ते 16 फूट आणि व्यास 8 फूट असेल. प्रत्येक स्तंभ यक्ष-यक्षिणियांच्या 16 मुर्त्यांनी सुसज्ज असतील.

Image Credited – Aajtak

मंदिराच्या प्रथम तळातील गर्भगृहात प्रभू रामाची मुर्ती असेल. तर दुसऱ्या तळातील गर्भगृहात राम दरबारची स्थापना होईल. तिसऱ्या तळातील गर्भगृहात प्रभू रामासंबंधित प्रसंगांच्या मृत्या असतील.

Image Credited – Aajtak

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी चांदीची विट ठेवून मंदिराची पायाभरणी करतील. मुख्य कार्यक्रमात जवळपास 175 लोकांना आमंत्रण देण्यात आलेले आहे.