खरी चॅम्पियन! चक्क डोक्यावर दूधाचा ग्लास ठेवून केले स्विमिंग, एक थेंबही सांडला नाही

23 वर्षीय स्विमिंग चॅम्पियन कॅटी लेडेकीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅटीने 5 ऑल्मिम्पिक गोल्ड मेडल आणि 15 वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल जिंकले आहेत. व्हायरल होणाऱ्या भन्नाट व्हिडीओमध्ये ती चक्क डोक्यावर दुधाचा ग्लास ठेवून पोहत आहे. खास गोष्ट म्हणजे ती जवळपास 1 मिनिटे पोहत असताना या ग्लासातून एक थेंब देखील खाली सांडत नाही.

कॅटीने सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिसत आहे की कॅटी डोक्यावर ग्लास ठेवते व पोहत आहे. त्यानंतर दुसऱ्या टोकाला पोहचत ग्लासातील दूध पिते. या व्हिडीओला आतापर्यंत 35 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिले आहे.

कॅटीने #gotmilkchallenge अंतर्गत हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत ही माझ्या करिअरमधील सर्वोत्तम स्विमिंग असल्याचे देखील म्हटले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, शेकडो युजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.