जेलमधील कैदी मुलाला सोडविण्यासाठी आईने खोदले भलीमोठे सुरंग, मात्र …

आतापर्यंत जेलमधून पळून जाण्यासाठी कैद्यांनी केलेले विविध प्रकार तुम्ही अनेकदा ऐकले असतील. अनेकदा कैदी सुरंग खोदून फरार होता. मात्र युक्रेनमधील एका कैद्याच्या आईने याहीपेक्षा पुढील टप्पा गाठला आहे. यूक्रेनमधील एक आईने आपल्या जेलमध्ये बंद मुलाला बाहेर काढण्यासाठी स्वतः सुरंग खोदले. मात्र या आरोपी महिलेला यात यश मिळाले नाही व पोलिसांनी पकडले. आता ही महिला स्वतःच जेलमध्ये पोहचली आहे.

आपल्या मुलाला वाचविण्यासाठी 51 वर्षीय महिलेने ही संपुर्ण योजना आखली होती. यासाठी महिलेने सर्वात प्रथम ज्या जेलमध्ये मुलगा शिक्षा भोगत होता त्या जपोरिझिआ भागात भाड्याने घर घेतले. लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून महिला केवळ रात्री खोदकाम करत असे. याशिवाय एका आवाज न करणाऱ्या स्कूटरच्या मदतीने महिला या ठिकाणी पोहचत असे.

काही दिवसांच्या मदतीनेच महिलेने 10 फूट सुरंग खोदली. मुलाला तेथून बाहेर काढण्यासाठी जवळपास 35 फूट खोल खड्डा करणे गरजेचे होते. स्थानिक लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून महिला अधिकतर वेळ भाड्याच्या घरातच राहत असे व रात्र होताच घराच्या बाहेर पडून आपले काम करत असे.

महिलेने जवळपास 3 आठवडे खोदकाम करत 3 टन माती काढली. अखेर पोलिसांच्या याकडे लक्ष जातच त्यांनी महिलेला अटक केले. महिलेच्या कृत्यावर काहीजण टीका करत आहेत. तर महिलेने मुलाला सोडविण्यासाठी केल्या प्रयत्नांचे काहीजण कौतुक देखील करत आहेत.