अरेच्चा! पाण्यात डुबकी मारुन एका श्वासात या पठ्ठ्याने सोडवले 6 रुबिक क्यूब

सोशल मीडियावर रुबिक क्यूब सोडवणाऱ्या एका युवकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 25 वर्षीय इलायाराम सेकरने एका श्वासात पाण्याच्या आत अधिकाधिक रुबिक क्यूब सोडविण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न केला आहे.

सेकरने अवघ्या 2.17 मिनिटांमध्ये पाण्यात डुबकी मारुन 6 रुबिक क्यूब्स यशस्वीरित्या सोडविण्याचा विक्रम केला आहे. याआधी 2014 मध्ये 5 रुबिक सोडविण्याचा विक्रम होता.

या विक्रमाविषयी इलायाराम सेकर म्हणाला की, अखेरकार 6 वर्षांनी विक्रम मोडण्यात मला यश आले. आशियामध्ये हा विक्रम करण्याचा प्रयत्न करणारा मी पहिला व्यक्ती आहे. सेकर सध्या चेन्नईमधील एका शाळेत काम करतो.

तो म्हणाला की, मला आपल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक करत राहण्यासाठी प्रेरित करायचे आहे. महामारी येईल आणि जाईल, मात्र आपल्या मेंदू आणि आत्म्याला जीवनातील कोणत्याही गोष्टीचा सामना करण्यासाठी उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.