पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर पंतप्रधान कार्यालयातील मोठी जबाबदारी


पुणे – पंतप्रधान कार्यालयात पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली असून पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. दरम्यान पुढील चार वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत या पदावर ते कार्यरत राहणार आहेत. २००८ च्या बॅचचे नवल किशोर राम हे सनदी अधिकारी आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात उपसचिव पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.