आणखी एका केंद्रीय मंत्र्याला कोरोनाची लागण

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. अनेक राज्याती मुख्यमंत्री, नेतमंडळीना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता आणखी एका केंद्रीय मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळातील संक्रमित झालेले ते दुसरे मंत्री आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे.

धर्मेंद्र प्रधान ट्विट करत सांगितले की, कोव्हिड-19 ची लक्षणे दिसल्यानंतर मी चाचणी केली ज्यात माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये भरती झालो असून, आता ठीक आहे.

दरम्यान, अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.