आमचा राजकुमार अयोध्येचा जावई, दक्षिण कोरियाच्या राजदूताचा दावा

काही दिवसांपुर्वी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी खरी अयोध्या नेपाळमध्ये असल्याचे म्हटले होते. आता दक्षिण कोरियाने देखील अयोध्याशी आपले नाते असल्याचा दावा केला आहे. दक्षिण कोरियाचे दूत शिन बोंग-किल यांनी अयोध्या आणि कोरियाच्या संबंधांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, कोरियाच्या एका प्राचीन पुस्तकात लिहिले आहे की अयोध्याच्या एका राजकुमारीने कोरियन राजा किम सुरोसोबत लग्न केले होते. राजा किम यांच्या मकबऱ्यात पुरातत्व निष्कर्षामध्ये अयोध्या संबंधित कलाकृती आढळलेल्या आहेत.

न्यूज18 च्या वृत्तानुसार, इतिहास सांगतो की इसवी सन 48 मध्ये अयोध्याची राजकुमारी सुरीरत्न कोरियाला गेली होती. जेथे राजकुमार किम सुरो यांच्याबरोबर लग्न केल्याने त्यांचे नाव हवांक ओके असे झाले. राजकुमारी सुरीरत्न जलमार्गाने कोरियाला गेल्या होत्या व सोबत जाताना एक दगड घेऊन गेल्या होत्या. हा दगड नावेला स्थिर ठेवण्यासाठी सोबत ठेवण्यात आला होता. हाच दगड त्यांच्या पगोडामध्ये स्मृति चिन्ह म्हणून संरक्षित आहे.

काशी हिंदू यूनिव्हर्सिटीचे इतिहास विभागाचे प्राध्यापक अतुल कुमार त्रिपाठी यांनी सांगितले, चीनी कथांनुसार अयोध्याच्या राजाला स्वप्न पडले. ज्यात त्यांना संदेश मिळाला की राजकुमारीचे लग्न कोरियाचे राजकुमार किमसूरो यांच्याशी करावे. सांगितले जाते की हवांग ओके आणि किमसुरो 150 वर्ष जगले. त्यांच्या मुलं-मुलींद्वारेच दक्षिण कोरियाची लोकसंख्या 10 टक्के आहे.