काल दिवसभरात देशात ५२ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर ८०३ जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोनाचे दुष्ट संकट अजूनच गहिरे होत असल्यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच काल दिवसभरात देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात ५२ हजार ०५० नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ५५ हजार ७४६ वर पोहोचली आहे. त्यापैकी आतापर्यंत १२ लाख ३० हजार ५१० जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाद्वारे देण्यात आली आहे.

देशात गेल्या चोवीस तासांमध्ये ५२ हजार ०५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ८०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान आतापर्यंत देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने साडेअठरा लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत १२ लाख ३० हजार ५१० जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, देशात ५ लाख ८६ हजार २९८ अॅक्टिव्ह केसेस असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ३८ हजार ९३८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.