रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रियंका गांधींनी शेअर केला राहुल गांधींचा फोटो, लिहिले…

देशभरात आज रक्षाबंधनांचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांनी देखील एकमेकांना या विशेष दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांना एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. आधी राहुल गांधी यांनी देखील प्रियंका यांच्यासोबत फोटो शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यानंतर प्रियंका गांधींनी देखील ट्विट केले.

प्रियंका गांधींनी ट्विट करत लिहिले की, प्रत्येक सुख-दुःखात सोबत राहत मी आपल्या भावाकडून प्रेम, सत्य आणि धैर्याची सोबत शिकले. मला असा भाव मिळाल्या गर्व आहे. सर्व देशवासियांना रक्षाबंधनांच्या हार्दिक शुभेच्छा.

राहुल गांधींनी देखील प्रियंका यांच्यासोबतच फोटो शेअर केला. यात दोघेही एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. सोबतच त्यांनी रक्षाबंधनांच्या शुभेच्छा दिल्या.