लता मंगेशकर यांनी मोदींना दिल्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा, पंतप्रधान म्हणाले …

रक्षाबंधनाच्या निमित्ताने गायिका लता मंगेशकर यांनी पंतप्रधान मोदींना खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. लता मंगेशकर यांनी सांगितले की कोरोनामुळे त्या यंदा राखी पाठवू शकल्या नाहीत. त्यांच्या ट्विटनंतर पंतप्रधान मोदींनी देखील उत्तर दिले.

लता मंगेशकर व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या की, नरेंद्र भाई, आज राखीच्या या शुभ दिनानिमित्ताने मी तुम्हाला प्रणाम करते. राखी तर मी आज पाठवू शकले नाहीत, त्याचे कारण सर्व जगाला माहिती आहे. नरेंद्र भाई मोदी आपण देशासाठी एवढे काम केले आहे आणि एवढ्या चांगल्या गोष्टी केल्या की देशातील नागरिक कधी विसरू शकत नाही. त्या पुढे म्हणाल्या की, आज भारतातील लाखो-कोट्यावधी महिला तुम्हाला राखी बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही वचन द्या की, तुम्ही भारताला अधिक उंचीवर घेऊन जाल. धन्यवाद.

लता मंगेशकर यांच्या ट्विटवर पंतप्रधान मोदींनी देखील उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, लता दीदी, रक्षाबंधनाच्या शुभ दिनानिमित्ताने तुमचा हा भावपुर्ण संदेश प्रेरणा आणि उर्जा देणारा आहे. कोट्यावधी माता-बहिणींच्या आशिर्वादाने आपला देश नवीन उंची गाठेल, नवनवीन यश प्राप्त करेल. आपणास निरोगी आणि दीर्घायुषी लाभावे, हीच देवाला प्रार्थना आहे.