पाकिस्तानचा न्यूज चॅनेल हॅक, अचानक स्क्रिनवर फडकला तिरंगा

पाकिस्तानच्या प्रमुख न्यूज चॅनेलपैकी एक असलेल्या डॉन चॅनेल हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. टिव्ही चॅनेलच्या स्क्रीनवर अचानक तिरंगा फडकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या न्यूज चॅनेलवर हॅकर्सने हल्ला केला होता. स्क्रीनवर तिरंगा फडकल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रविवारी दुपारी जवळपास 3.30 वाजता डॉन न्यूज चॅनेलवर जाहिरात सुरू होती. याच दरम्यान टेलिव्हिजन स्क्रिनवर अचानक तिरंगा फजरू लागला. यावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारा संदेश देखील लिहिण्यात आला होता.

डॉन न्यूजने याबाबत माहिती दिली की, रविवारी अचानक चॅनेलचे प्रक्षेपण सुरू होते. अचानक भारतीय ध्वज आणि ‘हॅप्पी इंडिपेंडेंस डे’ असा संदेश स्क्रीनवर दिसू लागला. काहीवेळासाठी हा संदेश होता व त्यानंतर गायब झाला.

चॅनेलवर भारताचा ध्वज कितीवेळ होता याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या संदर्भात डॉन चॅनेलच्या प्रशासनाने त्वरित चौकशीचे आदेश दिले आहेत.