सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आदित्य ठाकरेंवर निलेश राणेंचा गंभीर आरोप


मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची गुंतागुंत दिवसेंदिवस अधिकच होत असून मुंबई आणि बिहार पोलीस या आत्महत्या प्रकरणावरून आमनेसामने आले आहेत. तर या प्रकरणावरून दोन्ही राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच ढवळून निघत आहे. त्यातच आता भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.

या प्रकरणी केलेल्या ट्विटमध्ये दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटायला जातात. त्यानंतर लगेच आज पोलीस आयुक्त पत्रकार परिषद घेतात. काहीतरी गडबड आहे हे न समजण्याइतकी लोकं मूर्ख नाहीत. जसे दिवस जात आहेत तसे टी गँग पुरावे नष्ट करत आहे. म्हणून रोज धडपड सुरू आहे, अशी शंका निलेश राणे यांनी उपस्थित केली आहे.