नेपाळची नवीन चाल, आता भारताच्या या भागावर केला दावा

मागील काही दिवसांपासून भारत-नेपाळमध्ये सीमावाद सुरू आहे. आता नेपाळने पुन्हा एकदा विवादित वक्तव्य केले आहे. नेपाळने दावा केला आहे की, उत्तराखंड राज्यातील कुमाउ भागातील चंपावत जिल्हा त्यांच्या सीमेत येतो. हा दावा नेपाळच्या कंचनपूर जिल्ह्यातील भीमदत्त महानगरपालिकेच्या महापौराने केला आहे. त्यांच्यानुसार, मागील अनेक वर्षांपासून चंपावत जिल्हा नेपाळचा भाग आहे. कारण तेथील जंगलासाठी बनविण्यात आलेली कम्यूनिटी फॉरेस्ट कमेटी त्यांच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात येते.

महापौर सुरेंद्र बिष्ट म्हणाले की, चंपावत जिल्ह्यातील जंगलाचा काही भाग आमच्या महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो. येथील कम्यूनिटी फॉरेस्ट कमेटी अनेक वर्षांपासन भीमदत्त महानगरपालिकेच्या अंतर्गत काम करत आहे. अनेक वर्षांपुर्वी नगरपालिकेने या भागात लाकडाचे कुंपण देखील घातले होते.

आज तकच्या वृत्तानुसार, लाकडाचे कुंपण घालण्यासाठी 45 लाख रुपये खर्च आला होता. सुरेंद्र बिष्ट यांना तुम्ही यावर कसा दावा करु शकता ? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, जिल्ह्यातील ज्या भागामध्ये कुंपण घालण्यात आले होते, ती जागा नो मेन्स लँड आहे. आम्हाला सीमावाद नको आहे. कारण सीमावाद कोणासाठीही चांगला नाही. मात्र हे प्रकरण लवकरात लवकर सोडवावे, अशी आमची इच्छा आहे.