काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम कोरोना पॉझिटिव्ह, घरातच क्वारंटाईन

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून, आता लोकप्रतिनिधी देखील याच्या विळख्यात सापडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून, आता काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते होम क्वारंटाईन झाले आहेत. या संदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली.

कार्ती चिदंबरम यांनी ट्विट केले की, मला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लक्षणे हलके असून, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी होम क्वारंटाईन झालो आहे.

चिदंबरम म्हणाले की, मी विनंती करतो की मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी वैद्यकीय नियम पाळावेत.

कार्ती चिदंबरम हे तामिळनाडूमधील शिवगंगा येथील खासदार आहेत व ते ऑल इंडिया काँग्रेस कमेटीचे सदस्य आहेत. याआधी तामिळनाडूचे गव्हर्नर बनवारी लाल पुरोहित यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.