IAS ला फेसबुकवर आली थेट ‘झुकेरबर्ग’ची फ्रेंड रिक्वेस्ट, अधिकाऱ्याने विचारले, ‘स्विकारू का नको ?’

आयएएस अधिकारी अवनीष शरण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. ट्विटरवर मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. आता अवनीष शरण यांनी असेच एक मजेशीर ट्विट केले असून, ते बघून तुम्हाला देखील हसू येईल. शरण यांना फेसबुकवर थेट मार्क झुकेरबर्गची फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे.

तुम्हा सोशल मीडियावर अनेकदा लोकप्रिय, प्रसिद्ध व्यक्तींचे बनावट अकाउंट पाहिले असतील. असाच काहीसा हा प्रकार. एका युजरने चक्क फेसबुक संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या नावाने खाते उघडून शरण यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. अवनीष शरण यांनी याचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे.

अवनीष यांनी स्क्रिन शॉट शेअर करत लिहिले की, पहा फेसबुकवर कोणी मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे. मी स्विकारावी की नाही ?

त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक युजर्स यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.