‘आजारी पडल्यावर अमित शाहांनी एम्सऐवजी खाजगी रुग्णालय का निवडले ?’, थरूर यांनी उपस्थित केला प्रश्न

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काल कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अमित शाह यांना मेंदाता या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता यावरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

थरूर म्हणाले की, सार्वजनिक संस्थांना शक्तिशाली करण्याची गरज असून, हे जनतेच्या विश्वासाला प्रेरित करते. थरुर यांनी अमित शाह खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती झाले यावर प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, आश्चर्यच आहे की आजारी पडल्यावर आपले गृहमंत्र्यांनी एम्समध्ये जाण्याऐवजी शेजारील राज्यातील खाजगी हॉस्पिटल का निवडले ? लोकांचा विश्वास मिळवायचा असेल तर शक्तीशाली लोकांनी सार्वजनिक संस्थांना पाठिंबा देण्याची गरज आहे.

याआधी देखील लोकप्रतिनिधींनी कोरोनाची लागण झाल्यावर सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याने अशीच चर्चा रंगली होती. नेतेमंडळी सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये उपचार न घेता खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात, यावरूनच सार्वजनिक हॉस्पिटलची स्थिती लक्षात येते, असे अनेकदा म्हटले जाते.

दरम्यान, अमित शाह यांच्यासह देशातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील कोरोनाची लागण झाली आहे.