… म्हणून निमंत्रण असूनही राममंदिराच्या भूमिपूजनाला उपस्थित राहणार नाहीत उमा भारती

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांना अयोध्यामध्ये पार पडणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सरयू तटावर उपस्थित राहतील आणि कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर प्रभू रामाचे दर्शन घेतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोरोना पॉजिटिव्ह आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली.

उमा भारती यांनी सांगितले की, मी राम जन्मभूमी न्यासच्या अधिकाऱ्यांना सुचना दिली आहे की कार्यक्रमाच्या मुहूर्तावर अयोध्याच्या सरयू नदीच्या किनारी उपस्थित राहील. अयोध्यामध्ये एखाद्या संक्रमित व्यक्तीशी भेट होऊ शकते, अशा स्थितीमध्ये तेथे पंतप्रधान मोदी आणि अन्य शेकडो लोक उपस्थित असतील.

याशिवाय त्यांनी माहिती दिली की, कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित समूहाच्या यादीमधून माझे नाव काढण्यास देखील सांगितले आहे.

दरम्यान, 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. अयोध्यामध्ये याची जयत्त तयारी सुरू आहे.