राममंदिरासारखेच हुबेहुब दिसणार अयोध्या रेल्वे स्टेशन, जून 2021 पर्यंत पुर्ण होणार काम

येत्या 5 ऑगस्टला अयोध्यामध्ये भव्य राममंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. मात्र अयोध्यामध्ये केवळ राममंदिरच नाही तर यासोबतच संपुर्ण अयोध्याचाच कायापालट होणार आहे. भारतीय रेल्वेने सांगितले की, नवीन अयोध्या स्टेशनचे पहिल्या टप्प्यातील निर्मितीचे काम जून 2021 पर्यंत पुर्ण होईल. खास गोष्ट म्हणजे हे स्टेशन राममंदिरासारखेच दिसणार आहे. येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.

Image Credited – Twitter

उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव चौधरी यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म संख्या 1, 2/3 चे काम, आजुबाजूचा परिसर, पायऱ्या आणि पॅसेज इत्यादीचे काम पुर्ण केले जाईल. या स्टेशनच्या निर्मितीला 2017-18 मध्ये मंजूरी मिळाली होती. याच्या निर्मितासाठी जवळपास 104 कोटी रुपये खर्च येईल.

रेल्वमंत्री पीयूष गोयल यांनी देखील अयोध्या रेल्वे स्टेशनच्या मॉडेलचे फोटो शेअर केले. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, देशातील कोट्यावधी लोकांच्या आस्थेचे प्रतिक असलेल्या रामजन्मभूमि मंदिराचे दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींजीच्या नेतृत्वात रेल्वे अयोध्या स्टेशनचा पुनर्विकास करेल.

या स्टेशनचे महत्त्व लक्षात घेऊन येथे येणाऱ्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा, स्वच्छता, सुंदरता व इतर सेवा देण्यात येतील.