अमृत फडणवीसांवर युवासेनेचा पलटवार; मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर सुरक्षा सोडून द्या


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचे प्रकरणावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर नाव न घेता टीका केली होती. त्यावरुन आता अमृता फडणवीस आणि शिवसेनेत पुन्हा एकदा ट्विटर वॉर सुरु झाले. त्यांच्या या टीकेला युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ज्या पद्धतीने बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळले जात आहे, मला वाटते मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे मुंबईत सुरक्षित वाटत नाही, अशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते

त्यानंतर अमृता फडणवीसांना युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले. मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर (पोलिस संरक्षण) घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरोसा नसेल तर !!’ अशा शब्दात सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटचा समाचार घेतला.