मोठा दिलासा! भारतातील कोरोनाविरोधातील लढा आता होणार सोपा


नवी दिल्ली: देशावर ओढावलेल्या कोरानाच्या दुष्ट संकटाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाचा देशातील नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. आपल्या देशात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता. देशातील कोरोनाबाधित केसेस या युरोपशी संबंधित आहेत. देशात पसरलेला कोरोना याआधी विविध प्रकारचा होता. पण आता देशात एकाच प्रकारच्या कोरोनाचा फैलाव होत असल्याची माहिती समोर आली आहे. देशात एकाच प्रकारच्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आता त्याचा मुकाबला करणे सोपे असेल. कोरोनाचा फैलाव रोखण्यास सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे बऱ्यापैकी मदत झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.

कोरोनाबद्दलचा अहवाल जैवतंत्रज्ञान विभागाने तयार केला आहे. आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना शनिवारी हा अहवाल सोपवण्यात आला. कोरोनाचा A2a होलोटाईप विषाणूचा देशात वेगाने फैलावत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दुसऱ्या प्रकारच्या विषाणूला या विषाणूने हटवले आहे. भारतात सुरुवातीला कोरोना विषाणूच्या विविध प्रजाती पाहायला मिळत होत्या. यामध्ये युरोप, अमेरिका आणि पूर्व आशियातून आलेल्या कोरोनाच्या प्रजातींचा समावेश होता.

कोरोना विषाणूच्या विविध प्रजातींचा जगभरात फैलाव झाला आहे. A2a होलोटाईप, D614G, 19A आणि 19B चा यामध्ये समावेश आहे. सर्व प्रजातींमधील कोरोना विषाणूचा भारतात आधी संसर्ग झाला होता. युरोप आणि सौदी अरेबियातून भारतात A2a होलोटाईप विषाणू आला. याआधी जानेवारीत आलेला विषाणू वुहानमधून आला होता. हा विषाणू 19A आणि 19B प्रजातीमधील होता. मात्र त्यांचे प्रमाण A2a च्या तुलनेत कमी होते. त्यानंतर देशात केवळ A2a होलोटाईप शिल्लक राहिला. दिल्लीत D614G प्रकारच्या विषाणूचा फैलाव झाला होता. त्याचा प्रादुर्भाव आता कमी झाल्यामुळेच राजधानीतील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने कमी होताना दिसत आहे.