आणखी एका भारतीय क्रिकेटपटूच्या घरी हालला पाळणा


नवी दिल्ली – हार्दिक पांड्यानंतर भारतीय कसोटी संघाच्या एका क्रिकेटपटूच्या घरी पाळणा हालला आहे. आता भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर अभिनव मुकंदच्या घरीही पाळणा हालला असून यासंदर्भातील माहिती अभिनव मुंकुदने ट्विट करत आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

शनिवारी भारताचा क्रिकेटपटू अभिनव मुकुंदच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. मुकुंद आणि त्याची पत्नी आरभी या दाम्पत्याला पुत्ररत्न झाले आहे. मुकुंदने ट्विटरवर ही माहिती पोस्ट करून दिली. मुकुंद ट्विट करत म्हणाला की, माझी पत्नी आरभी आणि माझ्या आयुष्याला आज एक वेगळे वळण मिळाले आहे. एक पालक म्हणून आमचा प्रवास आजपासून सुरु होत आहे. आज सकाळी आमच्या घरात पुत्ररत्न जन्माला आले आहे.

भारताकडून अभिनव मुकुंदने सात कसोटी सामने खेळले आहेत. २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तामीळनाडूच्या या फलंदाजाने कसोटी संघातून पदार्पण केले होते. मुकुंदने ७ सामन्यांत ३२१ धावा केल्या. तामिळनाडूकडून प्रथम श्रेमी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १४५ सामन्यांत १०२५८ धावा आहेत. त्याच्या नावावर तिहेरी शतकही आहे. आयपीएलमध्ये अभिनवर मुकुंद पंजाब संघाकडून खेळतो.