देशाच्या गृहमंत्र्यांना कोरोनाची लागण


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोनाच्या विळख्या देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील अडकले आहेत. यासंदर्भातील माहिती स्वतः अमित शहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. आपण कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत असल्याने चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे अमित शहा यांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे.

ट्विटमध्ये अमित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्यात कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चे विलगीकरण करावे आणि आपली चाचणी करुन घ्यावी, असेही अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.