व्हिडीओ : हिंदुस्तान शिपयार्डमध्ये मोठी दुर्घटना, क्रेन कोसळल्याने 11 कामगारांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टनम येथील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे क्रेन कोसळल्याने 11 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. लोडिंग वर्कची पाहणी करताना अचानक क्रेन कोसळली. या भल्या मोठ्या क्रेनजवळ 18 कामगार काम करत होत असे सांगितले जात आहे.

पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. 10 जणांचा जागीच मृत्यू झाला तर काहीजणांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. क्रेनच्या खाली आलेल्या इतर कामगारांना ढिगाऱ्या खालून काढले जात आहे.

नवीन क्रेन लावल्यानंतर टेस्टिंग सुरू असतानाच अचानक ही घटना घडली. राज्य सरकारने या घटनेसंदर्भात अधिकाऱ्यांना त्वरित योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.