चीनला दणका, अमेरिका घालणार टीक-टॉकवर बंदी

काही दिवसांपुर्वी भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक करत टीक-टॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. मागील काही दिवसात ट्रेड वॉर, कोरोना व्हायरसवरून अमेरिकेचे देखील चीनसोबतचे संबंध बिघडले आहेत. आता अमेरिकेने चीनला मोठा झटका देत शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प म्हणाले की, एग्झिक्यूटिव्ह ऑर्डर काढून 24 तासात अमेरिकेत टीक-टॉकवर बंदी घातली जाईल. याआधीच ट्रम्प यांनी अनेकदा टीक-टॉकवर बंदी घालणार असल्याचे संकेत दिले होते.

ट्रम्प प्रशासनाने म्हटले होते की, आमचे प्रशासन देखील टीक-टॉकवर बंदी घालण्यासंदर्भात याचे मुल्यांकन करत आहे. एक लोकप्रिय चिनी व्हिडीओ अ‍ॅप आता राष्ट्रीय सुरक्षा आणि सेंसरशिपच्या मुद्याचा एक स्त्रोत बनले आहे.

काही दिवसांपासून चर्चा होती की बाइट डान्स टीक-टॉकला अमेरिकन कंपनीला विकू शकते. यासंदर्भात मायक्रोसॉफ्ट व इतर अमेरिकन कंपन्यांशी चर्चा देखील सुरू होती. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत टीक-टॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.