तब्बल 50 वर्षांनी अचानक भेटल्या दोन बहिणी, असे ओळखले एकमेकींना

सोशल मीडियावर सध्या अमेरिकेच्या नेब्रास्का येथील एका 73 वर्षीय महिलेची गोष्ट प्रचंड व्हायरल होत आहे. याला कारणही तसेच आहे. कारण कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात त्यांना आपली सोडून गेलेली बहिण पुन्हा भेटली आहे. या बहिणींची जवळपास 50 वर्षांनी एकमेकींशी भेट झाली आहे.

कोरोना व्हायरसमुळे डोरिस क्रिप्पन या आपली लहान बहिण बेव बोरोला तब्बल 50 वर्षांनी भेटल्या. 53 वर्षीय बेव बोरो या फ्रेमोंट येथील मेथोडिस्ट हेल्थच्या डंकलाऊ गार्डनमध्ये काम करतात. त्यांची मोठी बहीण क्रिप्पन यांना हात तुटल्यामुळे त्याच हात तुटल्यामुळे त्याच हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. जेव्हा छोट्या बहिणीने वॉर्डच्या बाहेर रुग्णांच्या यादीत आपल्या बहिणीचे नाव बघितले, त्यावेळी त्यांना त्वरित लक्षात आले की, ती महिला आपली मोठी बहिणच आहे.

बोरो म्हणाल्या की, नाव बघितल्यावर माझ्या आश्चर्याचा ठिकाणा राहिला नाही. त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला सांगितले की मला वाटते आहे ती माझी बहिण आहे. 1967 साली जेव्हा वडील आम्हाला एकटे सोडून निघून गेले होते, त्यावेळी क्रिप्पनला देखील सोबत घेऊन गेले. त्यावेळी बोरो या केवळ 6 महिन्यांच्या होत्या.

क्रिप्पन यांनी सांगितले की, जेव्हा मी तिला पाहिले होते, त्यावेळी ती लहान मुलगी होती. मी कधीच विचार केला नव्हता की आम्ही पुन्हा भेटू. बोरो यांनी आपल्या मोठ्या बहिणीशी बोलण्यासाठी व्हाइटबोर्डची मदत घेतली. कारण क्रिप्पन यांना व्यवस्थित ऐकू येत नाही. दोघी बहिणी अनेकवर्ष एकमेकींना शोधत होत्या, मात्र त्यांची भेट झाली नाही. अचानक अशी भेट होणे चमत्कारच आहे.