जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरच्या आधीपासूनच या चित्रपटाची विशेष चर्चा होती. ट्रेलरमध्ये दिसत आहे की. कशाप्रकारे गुंजन आपल्या वडिलांच्या मदतीने पायलट बनण्याचे स्वप्न तर पुर्ण करते. त्यानंतर ट्रेनिगं व पायलट म्हणून हवाई दलात एकमेव महिला असल्याने कशाप्रकारे आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र या आव्हानांवर गुंजन मात करते.

ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट भारतीय हवाई दलातील पायलट गुंजन सक्सेना यांचा बायोपिक आहे. गुंजन सक्सेना यांनी 1999 मध्ये कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हा चित्रपट आधी 24 एप्रिलला रिलीज होणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. आता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 12 ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्माने केले आहे. यात जान्हवी कपूरसह पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीत कुमार सिंह, मानव विज आणि आयशा रझा हे देखील प्रमुख भूमिकेत दिसतील.