पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर रॉकेट हल्ला, 9 जणांचा मृत्यू

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानमधील 9 लोक मारली गेली आहेत. तर 50 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या दक्षिण पश्चिम सीमेवरून अफगाणिस्तानच्या शहरावर रॉकेट हल्ला केला. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात दावा केला आहे. दोन्ही देशांच्या वाढत्या तणावामध्ये आता अफगाणिस्तानने लष्कर आणि हवाई दलाला अलर्ट केले आहे.

दुसरीकडे पाकिस्तानने यावर म्हटले, अफगाणिस्तान सीमा रक्षकांनी आधी हल्ला केला होता. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानने गुरुवारी स्पिनबोल्डक रॉकेटने हल्ला केला. यात 9 नागरिक ठार झाले आहेत. तर 50 जण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने देखील प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याची माहिती देताना सांगितले की, अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने निर्दोष सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार केल्याने, पाकिस्ताने प्रत्युत्तर दिले. सैन्य आणि राजकीय माध्यमातून तणाव कमी करण्यात आला आहे.