कोरोना काळात हटके प्रयोग, हॉटेलमध्ये मिळत आहे कोव्हिड करी-मास्क नान

देशात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वेगाने वाढत आहे. नागरिकांमध्ये देखील व्हायरसबाबत प्रचंड भिती आहे. मात्र असे असले तरी अनेक हॉटेल्स-रेस्टोरेंट आपल्या हटके पदार्थांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृकता पसरवत आहेत. राजस्थानच्या जोधपूर येथील रेस्टोरेंट संचालकांनी असाच अनोखा प्रयोग केला आहे.

Image Credited – Aajtak

जोधपुरच्या एका रेस्टोरेंटने कोरोना काळातील वस्तूंचा आपल्या रेस्टोरेंटमधील मेन्यूमध्ये समावेश केला आहे. वैदिक रेस्टोरेंटचे संचालक अनिल कुमार यांनी दोन खास डिश तयार केल्या असून, यांना कोव्हिड करी आणि मास्क नान असे नाव दिले आहे.

Image Credited – Aajtak

खास गोष्ट अशी की प्लेटमध्ये पदार्थ ठेवल्यावर जणूकाही प्लेटमध्ये कोरोना व्हायरसच ठेवला आहे, असे वाटते. रेस्टोरेंटचे शेफने कोव्हिड करीमध्ये जो कोफ्ता टाकला आहे, तो कोरोना व्हायरस सारखाच दिसतो. खूप मेहनत घेऊन हा आकार बनवला जातो.

Image Credited – Aajtak

याशिवाय स्पेशल नान देखील बनविण्यात आले आहे, जे अगदी मास्क सारखे दिसते.