ऑस्ट्रेलियाच्या तटावर आढळला एलियनसारखा जीव, पाहून प्रत्येकजण झाले हैराण

एक खूपच दुर्मिळ आणि विशाल जीव ऑस्ट्रेलियाच्या तटावर लोकांना पाहण्यास मिळाला आहे. हा जीव पाहून पर्यटक देखील हैराण होत आहेत. कारण हा जीव एखाद्या एलियन सारखा दिसतो. हा जीव ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतातील दक्षिण-पश्चिम तटावर स्थित केनेट नदीच्या किनारी आढळला आहे. एलियन सारख्या दिसणाऱ्या या जीवाचे नाव ओशन सनफिश आहे. तटावर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या कॅथ रॅम्पट्न आणि हसबँड टॉम यांनी या माशाला शोधले.

Image Credited – Aajtak

कॅथ रॅम्पट्नने सांगितले की, मासा जवळपास 2 मीटर लांब आहे व तेवढाच रुंद आहे. मात्र हा या प्रजातीमधील सर्वात लहान मासा असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच या प्रजातीमध्ये याच्यापेक्षाही दुप्पट आकाराचे मासे आहेत. तेथील अनेक पर्यटकांनी हा मासा एलियन सारखा दिसतो असे म्हटले. याआधी असा मासा कधीच नव्हता पाहिला, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.

Image Credited – Aajtak

एक सनफिश 3 मीटर लांब, 4.2 मीटर उंच आणि  जवळपास 2.5 टन वजनाचा असू शकतो. हा मासा हल्ला करतो. एखाद्या नावेमुळे इजा झाल्याने हा मासा किनाऱ्यावर आला असेल, असे सांगितले जाते.

Image Credited – Aajtak

मासेतज्ञ राल्फ फोस्टर यांनी सांगितले की, सनफिश अनेकदा दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या समुद्र तटावर बाहेर येतात. मात्र या खोल समुद्रात असतात. जपान, कोरिया, तायवान या देशांमध्ये हा मासा खाल्ला देखील जातो.