नोकरीची सुवर्णसंधी, एसबीआयमध्ये 4 हजार पदांसाठी होणार भरती

पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी असून, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) भरती केली जाणार आहे. एसबीआयने अधिकारी पदासाठी जवळपास 4 हजार जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी नॉटिफिकेशन देखील जारी केले असून, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

एसबीआयमध्ये देशभरात 3850 अधिकारी पदांसाठी भरती केली जाणार आहे. एसबीआयच्या विविध शाखांमध्ये या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. विविध राज्यांनुसार पद संख्या वेगवेगळी आहे. महाराष्ट्राबद्दल सांगायचे तर राज्यात मुंबईसोडून एकूण 517 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट –

मान्यता प्राप्त यूनिव्हर्सिटीमधून कोणत्याही विषयात पदवी घेतलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित वर्गासाठी वयात 15 वर्षांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

27 जुलै 2020 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्जाची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2020 आहे. सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये असून, इतर वर्गांसाठी अर्ज शुल्क नाही.

या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून होईल. अधिक माहिती व अर्जासाठी एसबीआय करिअरची वेबसाईट www.sbi.co.in ला भेट देऊ शकता.