पुन्हा कॉमेंटरी पॅनेलमध्ये सहभागी करण्यासाठी मांजरेकरांनी बीसीसीआयला केली विनंती

क्रिकेटरनंतर कॉमेंटेटर बनलेले संजय मांजरेकर यांना काही महिन्यांपुर्वी बीसीसीआयने कॉमेंटटर्सच्या यादीतून वगळले होते. आता मांजरेकर यांनी बीसीसीआयला त्यांना आयपीएलच्या कॉमेंटरी पॅनेलमध्ये घ्यावे यासाठी विनंती केली आहे. माजरेंकराना या वर्षी मार्चमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेआधी कॉमेंटरी पॅनेलमधून हटविण्यात आले होते. मात्र ही सीरिज कोव्हिड-19 मुळे रद्द झाली होती.

आता सप्टेंबर ते नोव्हेंबर या दरम्यान होणाऱ्या आयपीएलच्या कॉमेंटरी पॅनेलमध्ये सहभागी करावे, असे संजय मांजरेकर यांनी बीसीसीआयला म्हटले आहे. बोर्डाला लिहिलेल्या ई-मेलमध्ये त्यांनी आपण बीसीसीआयच्या सर्व गाईडलाईन्सचे पालन करू, असे म्हटले आहे. या संदर्भात मांजरेकरांनी बीसीसीआयला दोन ई-मेल पाठवत आयपीएलच्या कॉमेंटरी पॅनेलमध्ये सहभागी करावे, असे म्हटले आहे.

मागील वर्षी वर्ल्ड कप दरम्यान मांजरेकरांनी रविंद्र जडेजावर टिप्पणी केली होती. यानंतर काही खेळाडूंनी बीसीसीआयला या संदर्भात तक्रार केल्याचे सांगितले जाते. या टिप्पणीवर मांजरेकरांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती.