स्मार्टफोन, हेडफोनला सॅनिटायझ करण्यासाठी सॅमसंगने आणले खास डिव्हाईस

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. व्हायरसपासून बचावासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा मोबाईल, हेडफोन या वस्तूंना आपला हात लागत असतो, मात्र आपण अशा डिव्हाईसना सॅनिटायझर करत नाही. यावर पर्याय म्हणून आता सॅमसंगने खास यूव्ही स्टरलायझर डिव्हाईस लाँच केले आहे. याच्या मदतीने स्मार्टफोन्स, चष्मा, ईएअरब्डस इत्यादी वस्तू सॅनिटायझ करता येणार आहेत.

Image Credited – samsung

यूव्ही स्टरलायझर वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. हे डिव्हाईस E.coli, Staphylococcus aureus आणि Candida albicans सहित 99 टक्के बॅक्टेरिया आणि किटाणूंना मारू शकते. हे स्टरलायझर 10 मिनिटांमध्ये तुमच्या गॅलेक्सी स्मार्टफोन, गॅलेक्सी बड्स आणि स्मार्टवॉचला डिसइनफेक्ट करू शकते. या स्टरलायझर विविध आकारांच्या डिव्हाईसला लक्षात घेऊन बनविण्यात आले आहे. जेणेकरून जास्तीत जास्त डिव्हाईस सॅनिटायझ करता येतील.

Image Credited – samsung

यूव्ही स्टरलायझर हे ड्यूल यूव्ही लाईट्सवर काम करते. जे वरील व खालील बाजूच्या पृष्टभागाला डिसइंफेक्ट करु शकते. हे यूव्ही स्टरलायझर कोठेही नेता येती. याची किंमत 3,599 रुपये आहे.