५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन आणणार रिलायन्स जिओ ?


नवी दिल्लीः १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ४ जी एलटीई फोनच्या लाँचिंगनंतर रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात अक्षरशः धुमाकूळ घातल्यानंतर जिओने जिओ फोन २ ला अपग्रेडेड व्हेरियंट म्हणून लाँच केल्यानंतरही जिओ फोनची जोरदार विक्री होत आहे. ६९९ रुपयांत जिओ फोन खरेदी केला जात आहे. पण आता आणखी एक सर्वात स्वस्त हँडसेट बाजारात उतरवण्याची योजना रिलायन्स जिओ बनवत आहेत. जिओ फोनचा स्वस्त व्हेरियंट म्हणून JioPhone 5 ला लाँच केले जाऊ शकते.

यासंदर्भात 91Mobiles च्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली आहे. सध्या जिओ फोन ५ वर काम सुरु असून जिओचा हा नवीन फोन सुद्धा एक फीचर फोन असणार आहे. ओरिजनल जिओ फोनचा जिओ फोन ५ एक लाइट व्हर्जन असणार आहे. म्हणजेच सध्याच्या किंमतीत जिओ फोन विकला जाणार आहे. लीक्सच्या माहितीनुसार, ३९९ रुपये किंमतीत जिओ फोन ५ लाँच केला जावू शकतो. म्हणजेच हा आतापर्यंत बाजारात येणारा सर्वात स्वस्त फोन असणार आहे. आतापर्यंतचे जिओचे रेकॉर्ड पाहिल्यास फीचर फोनमध्ये एलटीई कनेक्टिविटी असण्याची शक्यता आहे.

जिओ ५ मध्ये ४जी एलटीईसोबत KaiOS प्लॅटफॉर्म दिला जावू शकतो. म्हणजेच यात इंटरनेट ब्राऊजरसोबत काही अॅप्स आधीपासून फोनमध्ये दाखल असतील, व्हॉट्सअॅप, गुगल, फेसबुक यासारखे अॅप्स फोनमध्ये प्री लोडेड असतील.

त्याचबरोबर रिपोर्टमध्ये असे देखील म्हटले की, जिओ फोन ५ चे सर्व नंबर्सवर फ्री कॉल असेल. इंटरनेटचा वापर करण्यासाठी वेगळा रिचार्ज पॅक घ्यावा लागेल. जिओ फोनसाठी सध्याच्या प्लॅनसाठी जिओ फोन ५ किंवा जिओ फोन लाइट युजर्संसाठी आणले जाऊ शकते. नवीन जिओ फोनसाठी काही स्वस्त प्लॅन सुद्धा जिओ लाँच करण्याची शक्यता आहे.

ओरिजनल जिओ फोनप्रमाणे एक छोटा एलसीडी डिस्प्ले आणि कीपॅड फोनची किंमत कमी ठेवण्यासाठी फोनमध्ये दिला जाऊ शकतो. वाय फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिविटी देखील जिओ फोन लाइटमध्ये दिली जाण्याची शक्यता कमी आहे. तसेच फोनची किंमत कमी असल्याने यात कॅमेरा नसेल. लिमिटेड स्टोरेज असल्याने फोनमध्ये अॅप्स डाउनलोड केले जाणार नाहीत. जिओ फोन ५ च्या लाँचिंगसंदर्भात कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण या वर्षी किंवा पुढील वर्षी जिओ स्मार्टफोनसोबत हा फोन लाँच केला जाऊ शकतो.