सेटेलाईट फोटोद्वारे खुलासा, पँगाँग लेकमध्ये सैन्य वाढवत आहे चीन

एलएसीवर चीनसोबत सर्वकाही सुरळीत असल्याचे वाटत असतानाच चीनची आणखी एक चालबाजी समोर आली आहे. चीन पँगाँग झीलमध्ये आपले सैन्य वाढवत आहे. 14 जुलैला चर्चेनंतर चीनने अतिरिक्त बोट आणि सैन्याची तुकडीला पँगाँगमध्ये तैनात केले आहे. सॅटेलाईट फोटोंद्वारे याचा खुलासा झाला आहे. पँगाँग लेक येथील स्थिती सामान्य होण्याचे कोणतेही लक्षण नाही, कारण चीनी सैन्य येथील तैनाती वाढवत आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी दावा केला होता की, जमिनीवर स्थिती सामान्य आहे व सैन्य मागे घेतले जात आहे. मात्र आता 29 जुलैला स्पेस फर्म मॅक्सार टेक्नोलॉजीद्वारे घेण्यात आलेल्या फोटो चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या दाव्याच्या उलट असल्याचे दर्शवत आहेत.

सॅटेलाईट फोटोनुसार, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीपीएल) जराही मागे हटलेले नाही. चीनी सैन्य सध्या फिंगर फोर येथे ठाण मांडून आहे. नवीन फोटो पँगाँग सरोवराच्या किनाऱ्यावर फिंगर फाईव्ह आणि सिक्सवर पीएलएद्वारे करण्यात आलेली निर्मिती देखील स्पष्ट दर्शवतात.