कोरोना इफेक्ट; अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक उशिरा घेण्याचा ट्रम्प यांचा विचार!

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत सापडले असून, येथे लाखो लोकांचे या आजारामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणातच येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणुका पार पडणार आहेत. मात्र आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षी होणाऱ्या निवडणुका थोड्या उशिरा घेण्यात याव्यात असा सल्ला दिला आहे. सध्या निवडणुकीत ट्रम्प पिछाडीवर आहेत, मात्र त्यांनी कोरोना व्हायरसचे कारण देत निवडणुका उशिरा घ्याव्यात असे म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले की, जोपर्यंत लोक योग्यरित्या व सुरक्षित पद्धतीने मतदान करू शकत नाही, तोपर्यंत निवडणुका टाळाव्यात का ?

ट्रम्प यांनी ट्विट केले की, यूनिव्हर्सिल मेल-इन वोटिंगसोबत या वर्षी निवडणुका करणे हे इतिहासातील सर्वात चुकीचे व बनावट निवडणूक असेल. ही अमेरिकेसाठी मोठी लाजीरवाणी गोष्ट असेल. त्यामुळे लोक योग्यरित्या व सुरक्षित पद्धतीने मतदान करू शकत नाही, तोपर्यंत निवडणुका टाळाव्यात का ?