ऑगस्टमध्ये तब्बल 17 दिवस बंद राहणार बँका, पहा पुर्ण यादी

सण-उत्सवाला ऑगस्ट महिन्यात सुरुवात होणार आहे. या महिन्यात जवळपास 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेची काम त्वरित करू घ्या. अनेक सुट्ट्या असल्याने आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत, ते जाणून घेऊया.

ऑगस्टच्या पहिल्याद दिवशी बकरी ईद असल्याने 1 ऑगस्टला बँका बंद राहणार आहेत. 2 ऑगस्टला रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे. 2 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने देशातील अनेक ठिकाणी बँका बंद असतील. म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीच्या 3 दिवसात बँक बंद राहणार आहेत.

यानंतर 8 आणि 9 ऑगस्टला दुसरा शनिवार व रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. 11, 12 ऑगस्टला गोकुळाष्टमीची अनेक ठिकाणी सुट्टी आहे. 13 ऑगस्टला पेट्रियोट डे असल्याने इंफाल झोनमध्ये बँका बंद असतील. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाची राष्ट्रीय सुट्टी आहे. तर 16 ऑगस्टला रविवार असल्याने बँकांमध्ये कामकाज होणार नाही.

20 ऑगस्टला श्रीमंत संकरादेव तिथी, 21 ऑगस्टला तीज-हरतालिका आणि 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. याशिवाय 23 ऑगस्टला रविवार, 29 ऑगस्टला महिन्याचा चौथा शनिवार आणि 30 ऑगस्टला मोहरममुळे बँका बंद राहतील. दरम्यान, राज्यांनुसार सुट्ट्यांमध्ये बदल देखील होऊ शकतो, याची नोंद घ्यावी.