धक्कादायक! दारु मिळाली नाही म्हणून पिले सॅनिटायझर, 9 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शासनाच्या निर्णयानुसार दारुची दुकाने बंद आहेत. लपूनछपून लोक दुप्पट पैसे देऊन दारू खरेदी करत आहेत. तर दारुचे व्यसन असणारे आपला जीव धोक्यात घालत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यातून समोर आला आहे. येथे दारू न मिळाल्यामुळे काही लोकांनी चक्क सॅनिटायझर पिले. यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील लॉकडाऊनमुळे मागील 10 दिवसांपासून दारुची दुकाने बंद आहेत. त्यामुळे दारुचे व्यसन असणाऱ्यांनी थेट सॅनिटायझरचे सेवन करण्यास सुरूवात केली. या मृतांमध्ये तीन भिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

सॅनिटायझर पिल्याने त्यांच्या पोटात अचानक आग होऊ लागली. एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन जणांचा हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली असून, पोलीस या प्रकारच्या घटना इतर ठिकाणी घडल्यात का त्याची पाहणी करत आहेत. मृतांचे वय 25 वर्ष ते 65 वर्षा दरम्यान आहे.