उद्यापासून मुंबईकरांची 20 टक्के पाणी कपात


मुंबई – बृह्नमुंबई महानगरपालिकेने उद्यापासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून शहरात 20 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्यासह पाण्याचा पुरेसा साठा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. कारण तलावातील पाणीसाठी अत्यंत कमी झाला आहे. सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात फक्त 4.9 लाख मिलियन जलसाठा आहे. जो जलाशयाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा फक्त 35 टक्के ऐवढाच आहे. गेल्या वर्षात 30 जून पर्यंत हा जलसाठा 82 टक्के झाल्याचे ही सांगण्यात आले आहे.

मुंबईची तहान भागवणाऱ्या सात तलावात येत्या 1 ऑक्टोंबरपर्यंत एकूण जलसाठी 14.5 लाख मिलियन व्हायला हवा. असे झाल्यास शहराला वर्षाअखेर पर्यंत पाणी कपातीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. शहरातील पाणी कपातीचा निर्णय घेण्यापूर्वी नागरी प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेत या निर्णयाची घोषणा केली आहे. दरम्यान जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याचे दिसून आले. परंतु ठाणे आणि रायगड जिल्ह्यात अत्यंत कमी जलसाठा झाला आहे. तर तुळशी तलाव पाण्याने तुडुंब भरल्याचे दिसून आले आहे.

एकूण 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची मुंबईकरांना योग्य पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यकता असते. परंतु सध्या फक्त 4 लाख 93 हजार 675 दशलक्ष लिटर पाणीसाठी उपलब्ध असल्यामुळे आता नागरिकांना पाणी कपातीची झळ सोसावी लागणार आहे.