अरेच्चा! या राज्याच्या सरकारी विभागात कर्मचाऱ्यांना फेंटेड जिन्स-टीशर्ट घालून येण्यास मनाई

मध्य प्रदेशच्या ग्वालेहर डिव्हिजनमध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सभ्य आणि योग्य असा कपडे घालून ऑफिसला येण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सोबतच फेंटेड जिन्स आणि टीशर्ट घालून येण्यास मनाई करण्यात आली आहे. डिव्हिजनचे आयुक्त एम बी ओझा यांनी आदेश जारी करत कर्मचाऱ्यांना याबाबत सुचना दिली आहे.

त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सभ्य, शालीन आणि औपचारिक कपडे घालून शासकीय कार्यालयात काम करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

एका अधिकाऱ्याने महत्त्वाच्या बैठकीत घातलेल्या फेटेंड जिन्स आणि टीशर्टचा उल्लेख करत ते म्हणाले की, हे कृत्य शासकीय सेवकाच्या पदाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. ओझा यांनी यासंदर्भात सर्व अधिकारी आणि जिल्हा कलेक्टर्सना पत्र पाठवले आहे.