‘या’ मुद्यावरून ट्रम्प यांनी चीनसह भारतावरही साधला निशाणा

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रदुषणाच्या मुद्यावरून भारतावर निशाणा साधला आहे. भारत, चीन आणि रशियाला प्रदुषणाबाबत काहीही चिंता नसून, अमेरिका आपल्या देशातील हवेची काळजी घेत असल्याचे, ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी अनेकवेळा प्रदुषणावरून भारतावर टीका केली आहे.

पॅरिस हवामान कराराचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले की, करार एकतर्फी आणि उर्जा वाया घालवणारा होता, म्हणून त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी जून 2017 मध्ये पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या करारांतर्गत हानीकारक ग्रीनहाउस गॅस उत्सर्जन कमी करण्यासाठी पावले उचलण्याविषयी जोर देण्यात आला होता. या करारात भारतासह अनेक देशांना मोठी सूट देण्यात आली होती.

ट्रम्प म्हणाले की, चीन आपल्याला वायू प्रदुषणाविषयी चिंता करण्यास सांगत आहे. मात्र स्वतःच्या देशातील प्रदुषणाकडे लक्ष देत नाही. भारत आणि रशिया देखील आपल्या देशातील हवेच्या गुणवत्तेची चिंता नाही. जोपर्यंत मी राष्ट्रपती आहे, तोपर्यंत अमेरिका प्रथम ही नीति लागू राहील.

ट्रम्प म्हणाले की, अनेक वर्षांपासून आपण दुसऱ्या देशांना स्वतःच्या आधी प्राथमिकता देत आलो, मात्र आता आपली प्राथमिकता अमेरिका आहे. मागील 70 वर्षात आपण पहिल्यांदाच उर्जा निर्यात करणारे देश बनलो आहोत. अमेरिका आता तेल आणि नैसर्गिक गॅस उत्पादक करणारा क्रमांक एकचा देश झाला आहे.