ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे मेड इन इंडिया म्हणजेच भारतीय कंपनीची सायकल चालवताना दिसले. जॉन्सन यांनी कोव्हिड-19 विरुद्धच्या लढ्यात अँटी-ओबेसिटी अर्थात लठ्ठपणाविरोधात सायक्लिंग आणि चालण्याचे अभियान सुरू केले आहे. या अभियानासाठी सरकार 19,397 कोटी रुपये खर्च करणार आहे. यात लोकांना सायकल चालविण्यासाठी प्रेरित केले जाईल. सायकल स्टेशन, रुट्स बनविण्यात येतील.
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी ‘मेड इन इंडिया’ सायकल चालवत केली या विशेष अभियानाला सुरुवात

कोव्हिड आणि लठ्ठपणाच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या या अभियानात बोरिस जॉन्सन भारतीय कंपनी हिरोची सायकल चालवताना दिसले. जॉन्सन यांना हिरो वाइकिंग प्रो बाइक चालवताना दिसले. बोरिस यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत हजारो किमीची सायकल लेन बनविण्यात आली आहे. ज्यावर लोक सायक्लिंग करून लठ्ठपणा कमी करतील. याद्वारे कोव्हिड-19 आणि अन्य आजारांची लढण्यास मदत मिळेल.
बोरिस म्हणाले की, मला माहिती आहे लोक सायक्लिंगकडे येतील. कारण हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे. यासाठी लोकांना ट्रेनिंग आणि सायकल देखील दिली जाईल. ई-बाईक्ससाठी निधी देखील दिला जाईल. सोबतच सायकल रिपेअरिंग योजना चालवली जाईल. पहिल्यांदा सायकल दुरुस्त करणाऱ्याला 50 पाउंडचे वाउचर देखील मिळेल.

दरम्यान, वाइकिंग प्रो बाईकला इनसिंक ब्रँडची कंपनी बनवते. ही भारतीय हिरो कंपनीचे एक स्बसडियरी आहे. इनसिंक ब्रँडचे मुख्यालय मॅनचेस्टर येथे आहे.