चीनी फोन खरेदी करायचा नाही ? हे आहेत भारतातील इतर 8 लोकप्रिय स्मार्टफोन

सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी वाढली आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारात चीनी कंपन्यांचे वर्चस्व आहे. असे असले तरी अनेकांना चीनी स्मार्टफोन खरेदी करायचे नाहीत. तुम्हाला देखील चीनी स्मार्टफोन खरेदी करायचा नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी इतर काही पर्याय घेऊन आला आहोत.

Image Credited – Amarujala

सॅमसंग गॅलेक्सी एम01एस –

या स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन लाइट ब्लू आणि ग्रे रंगात उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.2 इंचचा एचडी प्लस डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल  रियर कॅमरा सेटअप मिळेल. ज्यात 13 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सल सेंसर आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

Image Credited – Amarujala

सॅमसंग गॅलेक्सी एम30एस  –

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.4 इंच इनफिनिटी यू सुपर एमोलेड डिस्प्ले, एक्सीनॉस 9611 चिपसेट मिळेल. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.  यात 6000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.  या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे.

Image Credited – Amarujala

सॅमसंग गॅलेक्सी ए31 –

फोनमध्ये 6.4 इंच फूलएचडी+ डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर आणि6 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. फोनमध्ये 4 रियर कॅमेरे देण्यात आले असून, यातील प्रायमेरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी देखील मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी ए31 ची किंमत 21,999 रुपये आहे.

Image Credited – Amarujala

गॅलेक्सी नोट10 लाईट –

सॅमसंग गॅलेक्सी नोट10 लाईटच्या 6 जीबी+128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपये आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 40,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.7 इंच फूल एचडी प्लस डिस्प्ले, 2.7GHz चा Exynos 9810 प्रोसेसर मिळेल. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यातील तिन्ही कॅमेरा 12 मेगापिक्सल आहे. फ्रंटला सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

Image Credited – Amarujala

आयफोन एसई 2020 –

या फोनच्या 64 जीबी स्टोरेजची किंमत 42,500 रुपये आहे. 128 जीबी व्हेरिएंटची 47,800 रुपये आणि 256 जीबी स्टोरेजची किंमत 58,300 आहे. फोनमध्ये 4.7 इंच रेटिना एचडी डिस्प्ले, टच आयडी, ए13 बायोनिक प्रोसेसर आणि 12 मेगापिक्सल सिंगल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. सेल्फीसाठी 7 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

Image Credited – Amarujala

नोकिया 6.2 –

नोकिया 6.2 स्मार्टफोनची किंमत सध्या 12,499 रुपये आहे. ग्राहकांना या फोनमध्ये ड्युअल नॅनो सिम आणि अँड्राईड 9 पाय सपोर्ट मिळेल. ग्राहकांना 6.3 इंच फूल एचडी+ डिस्प्ले मिळेल, जो एचडीआर10 ने सुसज्ज आहे. स्क्रीनच्या प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास 3 दिले आहे. चांगल्या परफॉर्मेंससाठी ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636 एसओसी मिळेल.

Image Credited – Amarujala

नोकिया 7.2 –

नोकिया 7.2 च्या 4 जीबी + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 15,499 रुपये आणि 6 जीबी + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 17,099 आहे. फोनमध्ये 6.3 इंच फूल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. सोबतच 3500mAh बॅटरी देखील मिळेल. नोकिया 7.2 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यातील पहिला कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी यात फ्रंटला 20 मेगापिक्सल कॅमेरा आहे.

Image Credited – Amarujala

आसूस झेनफोन मॅक्स एम2 –

या फोनची किंमत 7,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.26 इंच एचडी+ डिस्प्ले मिळेल. याशिवाय 13+2 मेगापिक्सल रियर कॅमेरा, 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर आणि 4000 एमएएच बॅटरी मिळेल.