व्हिडीओ : कोरोनापासून बचावासाठी व्यक्तीने देशी जुगाड वापरत बनवली भन्नाट फेस शिल्ड

भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आले. लोक घरी तयार केलेले मास्क देखील वापरत आहेत. यातच आता देशी जुगाड वापरून फेस शील्ड तयार केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पद्धत वापरून कोणीही घरच्या घरी फेस शिल्ड सहज तयार करू शकते.

फेस शिल्ड तयार करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीष शरण यांनी ट्विटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अवनीष शरण यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, या देशीला कोणीही हरवू शकत नाही शून्य खर्च फेस शिल्ड. अद्भूत शोध. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, व्यक्तीच्या हातात सॉफ्ट ड्रिंगची एक मोठी प्लास्टिकची बाटली आहे. या बाटलीची वरची व खालची बाजू कापलेली आहे. त्यानंतर बाटलीली मध्यभागी कापत, चेहऱ्यावर लावतो. या देशी जुगाडाद्वारे अगदी शून्य रुपयात फेस शिल्ड बनवणे शक्य आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.