इंडियन प्रिमियर लीगची बीसीसीआय आणि क्रिकेट यूएई जोरदार तयारी करत आहे. आयपीएलचे चेअरमन ब्रजेश पटेल यांनी मागील आठवड्यात माहिती दिली होती की स्पर्धेची सुरुवात 19 सप्टेंबरला होईल व अंतिम सामना 8 नोव्हेंबरला खेळला जाईल. मात्र आता आयपीएलचा अंतिम सामन्याची तारीख बदलल्याची माहिती समोर आली आहे.
आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, आता या तारखेला अंतिम सामना होण्याची शक्यता?
एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, गव्हर्निंग काउंसिलची बैठक शनिवारी होणार आहे. या बैठकीत अनेक मुद्यांना हिरवा कंदील मिळू शकतो. बैठकीत पुर्ण वेळापत्रकासह सर्व संघांच्या अंतिम एसओपीला देखील मंजूरी दिली जाईल. याशिवाय अंतिम सामना हा 8 नोव्हेंबरच्या ऐवजी 10 नोव्हेंबरला खेळला जाण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बीसीसीआय दिवाळीच्या संपुर्ण आठवड्याला कमर्शियल वापर करण्याची योजना बनवत आहे व हे सर्व ब्रॉडकास्टरच्या दबावामुळे होत आहे. त्यामुळे आयपीएलच्या अंतिम सामन्याची तारीख बदलण्याची शक्यता आहे.