भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने मुलाला जन्म दिला आहे. पांड्याने सोशल मीडियावर या नवीन पाहुण्याच्या आगमनाची माहिती दिली. त्याचे लाखो चाहते त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. हार्दिकने बाळाचा हात हातात घेतलेला एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हार्दिक पांड्या-नताशाला पुत्ररत्न, शेअर केला गोंडस फोटो
हा सुंदर फोटो शेअर करताना मुलाचा आनंद हार्दिक पांड्याने व्यक्त केला आहे. नताशा आणि हार्दिकने आपल्या फॅन्सला याची कल्पना आधीच दिली होती. हार्दिकने फोटो शेअर करत लिहिले की, आमच्या घरी बेबी बॉय आला आहे.
हार्दिक आणि नताशा यांनी आपले या काळातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मुलाच्या नावाची माहिती अद्याप हार्दिकने दिली नसली तरी नाव काय ठेवणारे, यावरून चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
दरम्यान, दोघांनी 1 जानेवारी 2020 ला साखरपुडा केल्याची माहिती देत आपल्या चाहत्यांना सुखःद धक्का दिला होता. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये दोघांनी लग्न केल्याचे देखील सांगितले जाते.