अमेरिकन संशोधकांचा नवा दावा: 70 वर्षांपासून वटवाघळांमध्ये होत आहे कोरोनाचा प्रसार


वॉशिंग्टन – संपूर्ण जगभरासाठी चिंतेचा विषय बनलेल्या कोरोना व्हायरसवर सध्या खूप प्रमाणात संशोधन सुरु आहे. त्यातच या दरम्यान नवनवीन संशोधनांची माहिती समोर आहे. नुकतीच अशीच एक माहिती समोर आली आहे. हे संशोधन अमेरिकेतील संशोधकांनी केले असून त्यांच्या संशोधनानुसार मागील अनेक दशकांपासून ‘हॉर्सशू’ नामक वटवाघळांच्या प्रजातीपासून कोरोनाचा प्रसार होत आहे. पण याची माहिती आतापर्यंत कोणालाच नव्हती. त्यामुळेच सध्याच्या घडीला कोरोनाची वंशावळ समजून घेण्याची गरज आहे. संशोधकांच्या या नव्या संशोधनानुसार, जो कोरोना व्हायरस सध्या सर्वत्र पसरत आहे, त्याचे पूर्वज वटवाघुळांमध्ये 40 ते 70 वर्षांपासून अस्तित्त्वात आहेत.

जगभरातील संशोधक कोरोना आणि वटवाघळांच्या संबंधांवर संशोधन करत आहेत. संशोधकांनी संशोधनात मिळालेले निष्कर्ष जारी केले आहेत. याबाबत माहिती देताना पेन्सिलवेनिया स्टेट यूनिव्हर्सिटीचे संशोधक मेसीज बोनी यांनी सांगितल्यानुसार, इतरही व्हायरस वटवाघळांमध्ये उपस्थित असतील, यामुळे इतर संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. या संशोधनामध्ये कोरोनाच्या त्या थेअरीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे, ज्यात कोरोना लॅबमध्ये तयार झाल्याचे म्हटले जात जात आहे.

ग्लासगो यूनिव्हर्सिटीचे संशोधक प्रो. डेविड रॉबर्टसन यांनी सांगितल्यानुसार, वटवाघळामध्ये असलेल्या व्हायरसशी मिळता जुळता सध्या पसरणारा महामारीचा व्हायरस आहे. हा आपल्या पुर्वज व्हायरसपासून अनेक वर्षांपासून वेगळा झाला. प्रो डेविड सांगतात की, हा व्हायरस माणसापर्यंत कसा आला, हे आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे.

(टिप : वरील बाबी संशोधन अथवा अभ्यासतून सिद्ध झालेल्या असून त्या केवळ माहिती म्हणून आम्ही आमच्या वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याचा दावा माझा पेपर यातून करत नाही.)