‘राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होत असताना धर्मनिरपेक्षता कोठे गेली होती ?’

राम मंदिराच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होत असल्याने वाद सुरू झाले आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी यावरून टीका केली होता. आता ओवेसी यांच्या टीकेला भाजपचे युवा खासदार तेजस्वी सुर्या यांनी उत्तर दिले आहे. तेजस्वी सुर्यांनी आधी राष्ट्रपती भवनात आयोजित केल्या जाणाऱ्या इफ्तार पार्टीवर प्रश्न उपस्थित केले आहे. ट्विट करत तेजस्वी सुर्या म्हणाले की, जेव्हा देशाचे राष्ट्रपती आणि राज्यांचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी होत असताना, तुमची धर्मनिरपेक्षता कुठे होती ?

ओवेसी यांनी म्हटले होते की, भूमीपूजनाला उपस्थित राहणे हे पंतप्रधानांच्या घटनात्मक शपथेचे उल्लंघन आहे. धर्मनिरपेक्षता हा घटनेचा मूळ पाया आहे. यावरून तेजस्वी सुर्या यांनी निशाणा साधला आहे.

तेजस्वी सुर्या यांनी ट्विट केले की, जेव्हा देशाचे राष्ट्रपती आणि राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या अधिकृत निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन करत होते, त्यावेळी तुमची धर्मनिरपेक्षता कोठे गेली होती ? मंदिर पाडून मशिद उभारण्यात आली होती. ही चूक आता सुधारण्यात आली आहे. रझाकारांकडून आम्हालाल संविधानाचा धडा शिकण्याची गरज नाही.

दरम्यान, 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. याची जयत्त तयारी सुरू आहे.