2 दशकांनंतर ब्रिटनवरून भारतात परतणार 9व्या शतकातील भगवान शिवची दुर्मिळ मुर्ती

राजस्थानच्या एका मंदिरातून चोरी झालेली आणि तस्करीतून ब्रिटनला पोहचलेली भगवान शिवची 9व्या शतकातील एक दुर्मिळ पाषाण मुर्ती भारतात परतणार आहे. यामुर्तीला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला (एएसआय) सोपवले जाणार आहे. नटराजची ही पाषाण मुर्ती जवळपास 4 फूट उंच आहे.

Image Credited – indiatimes

या मुर्तीची चोरी 1998 साली राजस्थानच्या बरोली येथील घाटेश्वर मंदिरातून झाली होती. यानंतर तस्करीतून ही मुर्ती ब्रिटनला पोहचल्याची माहिती 2003 साली समोर आली होती. ब्रिटनमधील भारतीय उच्चायोगाने सांगितले की, लंडनमध्ये याची माहिती मिळताच ब्रिटनच्या अधिकाऱ्यांन याबाबत सांगण्यात आले. यानंतर ही मुर्ती असणाऱ्या खाजगी संग्रहकर्त्यांने स्वतःच्या इच्छेने 2005 मध्ये मुर्ती ब्रिटनमधील भारतीय उच्चयोगाला सोपवली.

यानंतर 20017 साली एसएआयच्या टीमने तेथे जाऊन या मुर्तिचे परीक्षण केले. तज्ञांनी पुष्टी केले की ही घाटेश्वर मंदिरातून चोरी झालेलीच मुर्ती आहे. ही मुर्ती आतापर्यंत लंडनमधील उच्चायोगाच्या इमारतच्या मुख्य प्रवेश कक्षात ठेवण्यात आली होती. आता ही मुर्ती भारतात परतणार आहे.