आता अमेरिकेतील युवकांना शिकवले जाणार महात्मा गांधींचे विचार

अमेरिकेच्या संसदेत एका कमेटीने एका महत्त्वाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. या अंतर्गत महात्मा गांधी, मार्टिन लुथर किंग ज्यूनियर यांचा वारसा पुढे नेला जाणार आहे व युवकांना त्यांच्या विचारांची माहिती दिली जाणार आहे. काही दिवसांपुर्वीच अमेरिकेत सिव्हिल राइट्स आयकॉन जॉन लुइस यांचे निधन झाले. या निमित्ताने अमेरिकेच्या संसदीय कमेटीने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आहे.

या प्रस्तावाचे समर्थन भारतीय वंशाचे अमेरिकन काँग्रेसमन एमी बेरा यांनी देखील केले. यानंतर हाउस फॉरेन अफेयर्स कमेटीने गांधी-किंग एक्सचेंज एक्टला मंजूरी दिली. या अंतर्गत भारत आणि अमेरिकेत महात्मा गांधी, मार्टिन लुथर किंग ज्यूनियर यांच्याबाबत शिकवले जाईल.

प्रस्तावात म्हटले आहे की, जॉन लुईस हे समाजासाठी लढाई लढले. ते केवळ अमेरिकेच नाही तर संपुर्ण जगात एक हिरो होते. त्यांनी मानवता, समानता आणि न्यायासाठी आवाज उठवला. जसे, महात्मा गांधी, मार्टिन लुथर किंग ज्यूनियर यांनी समाजासाठी काम केले, तेच जॉन यांनी केले. त्यामुळे येणाऱ्या पिढीला त्यांच्याबाबत सांगणे गरजेचे आहे. दोन्ही देशांच्या अभ्यासक्रमात या महान व्यक्तींबाबत राष्ट्रीय अभ्यासक्रमात शिकवले जाईल.

जेव्हा मार्टिन लूथर किंग भारत दौऱ्यावर आले होते, त्या घटनेला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने गांधी-किंग एक्ट बनविण्यात आला होता. जेणेकरून युवकांना त्यांच्याबाबत शिकवले जाईल.